दोन हजार रुग्ण वाढलेच ना?

Foto
मग लॉकडाऊनचा काय उपयोग?
नागरिकांकडून उपस्थित होतोय प्रश्न
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून औरंगाबाद शहरात १० जुलै ते आज १८ तारखेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. परंतु या नऊ दिवसांत कोरोनाबाधीतांची संख्या पाहिली तर दोन हजारच्या वर गेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन करून काय उपयोग? असा प्रश्न देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लॉकडाऊनपूर्वी ९ जुलै पर्यत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही ७६७२ एवढी होती. तर लॉकडाऊनच्या काळात १० ते आजपर्यंत तब्बल २४९४ रुग्णांची भर पडली आहे. त्यातील अँटीजेन टेस्ट टेस्टद्वारे ७५३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे आज जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या १०१६६ वर जाऊन पोहचली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी नऊ दिवसांचा शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आला. मात्र दुसरीकडे असे असताना देखील २४९४ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन करूनही रुग्ण जर वाढत असले तर लॉकडाऊनचा काय उपयोग? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहेत. 
लॉकडाऊनच्या काळात वाढले २४९४ रुग्ण
१० तारखेपासून ते आजपर्यंत १८ तारखेपर्यत लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पूर्वी ९ जुलै पर्यत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा अहवाल पाहिला तर एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही ७६७२ एव्हढि होती. तर त्यानंतर १० ते आज दि.१८ जुलै सकाळपर्यत २४९४ रुग्ण वाढले. त्यामुळे लॉकडाऊनचा उपयोग करून खरच काही उपयोग झाला का? असा प्रश्न या आकडेवारीवरून उपस्थित होताना दिसत आहे. 
यामुळे देखील वाढली रुग्णसंख्या?
शहरात एकीकडे लॉकडाऊनचा काय फायदा झाला? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे पाहिले तर शहरात कोरोनाच्या तपासण्या देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्यात १० तारखेपासून सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्ट टेस्टद्वारे शहरात विविध ठिकाणी शिबीर घेऊन स्वॅब टेस्ट करण्यात आल्या. ठीक-ठिकाणी मोबाईल स्वॅब टेस्ट देखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक तपासणी करण्यात आल्या त्यामुळे देखील कोरोनाचे रुग्ण समोर आले. त्याचा परिणाम कोरोनाबाधीतांची संख्येत भर पडली आहे. लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेल्या अँटीजेन स्वॅब टेस्टमध्ये ७५३ रुग्ण वाढले.